प्रकरण पाच - हुंबाबाचा संहार

गिल्गमेशच्या स्वप्नांची मालिका

पहिले स्वप्न - गवा
गिल्गमेश आणि एंकिडू, सिडारवनातील अवाढव्य पर्वताचे भयचकित नजरेने निरीक्षण करत असतात. ऊंचचउंच वृक्ष, हुंबाबानिवासाकडे जाणारा सरळसोट रस्ता, देवांच्या कॉलनीकडे जायचा दुसरा रस्ता. इश्तारचे सिंहासन होते तो भाग. (इश्तार व सर्व देव स्वर्गातही रहायचे, तेव्हा सिडारवन हे त्यांचे विकेंडहोम असावे.) त्या स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती घेऊन मग योग्य जागा बघून गिल्गमेश व एंकिडू आपला तंबू ठोकतात.

शी-शू सगळे झाल्यावर, रात्रीचे भोजन घेऊन, दोघे झोपी जातात. 
थोड्या वेळाने, गिल्गमेश एंकिडूला म्हणतो - जागा हो मित्रा, त्वरा कर, जागा हो, मी भयंकर अपशकुनी स्वप्न पाहिले आणि माझी झोपच उडाली. मी स्वप्नात एक कुरणावर चरणारा एक महाकाय गवा बघितला. मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. त्याने एका बाजूला थोडेसे कलून खूरांनी जमीन खोदली, त्यातून सर्वत्र एवढी माती उडाली की तिने सगळा आसमंत भरुन गेला आणि सगळीकडे अंधार पसरला. मी त्याला घाबरून पुढे जाण्यास रस्ता दिला. पण त्याने मला एका बाजूला दाबून खिळवून ठेवले. नंतर त्याने मला त्याच्याकडचे पाणी प्यायला दिले. मित्रा, हे मला भयंकर अपशकुनी वाटते आहे, हुंबाबा मला पाणी पाजणार असाच अर्थ वाटतो आहे या संकेताचा.
एंकिडू म्हणतो - मेट, शांत हो. हुंबाबा अतिशय अगडबंब, अक्राळविक्राळ आहे, त्याचे रुप विचित्रतेच्याही पलिकडे आहे. देव त्याला गवारुपात नक्कीच दाखविणार नाहीत. तू जो गवा पाहिलास तो खरेतर, तेज:पुंज श्री शमाशदेवच होता. त्याने तुला पाणी पाजले म्हणजे आपल्याला संकटसमयी तो मदत करेल. तुझी कुलदेवता,  तुझे रक्षण करेल, लोड नको घेवूस. मग बरेच काय काय सांगतो, आपण हुंबाबामर्दन केलं तर नाव होईल, वगैरे. (वा रे, पठ्ठ्या, गुरुची विद्या गुरुलाच.)
मग ते दोघे शांतपणे एकमेकाचे हात धरुन परत झोपी जातात.  
*

दुसरे स्वप्न - पर्वतपतन

मध्यरात्रीनंतर गिल्गमेश परत दचकून उठला, तो घामाने चिंब भिजला होता. बिचार्‍या एंकिडूला परत एकदा त्याने उठवले, तो म्हणाला - एंकिडव्या भावा, मला अजून एक स्वप्न पडले, एक प्रचंड पर्वत माझ्या अंगावर पडला. तो पर्वत एवढा प्रचंड होता की मी त्याच्यापुढे जणू मच्छर !  मी अडकून बसलो. मग आकाशातून प्रखर प्रकाशझोत आला त्यातून एक तेजोमय व्यक्ती बाहेर आली तिने मला हाताला धरून सहजरीत्या बाहेर काढले, प्यायला पाणी दिले. मला परत जमिनीवर उभे केले.
यात घाबरण्यासारखे काय आहे खरेतर? एंकिडूने परत पूर्वीसारखे सगळे फंडे दिले, हे सर्व फारच शुभ आहे म्हणाला. यावेळेला जरा बदल म्हणजे, पर्वत हा हुंबाबा तर तो प्रकाशपुरुष म्हणजे गिल्गमेशचे पप्पा - लुगालबंद. त्यांचापण या मोहिमेला पाठिंबा आहे.
यानंतर दोघांचीही झोप गेली होती. त्यांनी परत पुढे मार्गक्रमण सुरु केले. वीस योजनं गेल्यावर खाऊ खाल्ला, अजून तीस योजनं पुढे चालेतो रात्र झाली मग डेरा ठोकला. झोपायच्या आधी गिल्गमेश, आता काय स्वप्न पडते म्हणून जरा टेन्शनमधे होता. त्याने ज्येष्ठांनी सांगितलेला विधी केला - खड्डा खणला, अन्नजल अर्पण करून म्हणाला. देवा, आज माझ्यावाटचं स्वप्न एंकिडूला पडूदे. बिचार्‍याची झोपच झाली नव्हती आदल्या रात्री. देवांना असलं काय ऐनेवेळचं डेलिगेशन पसंत नव्हतं, त्यांनी ग्रॅंड इग्नोर मारलं आणि गिल्गमेशलाच परत स्वप्न पाडलं.
*

तिसरे स्वप्न - भयकंप

तिसर्‍या स्वप्नात काही विशेष सांगण्यासारेखं नाहीये. सगळीकडे अंधार, काळेकुट्ट ढग जमले, त्यातून मृत्यूचा अग्निवर्षाव वगैरे वगैरे. लय बोर. गिल्गमेश प्रचंडच गळबटला. एंकिडूने त्याला शांत केले व म्हणाला. चल जरा आपण सखल भागात जावून या स्वप्नावर चर्चा करू, तिथे तुला बरे वाटेल.  वातावरण निवळण्यासाठी काय केलं पाहिजे हे एंकिडूकडून शिकावं. काही मनाविरुद्ध झालं तरी हा संयमाने असा काही ट्विस्ट मारायचा की बोलायची सोय नाही. यावेळेला त्याने स्वप्नाचा काय अर्थ लावला आहे ते समजत नाही. (त्या ओळी खराब अवस्थेत आहेत). पण एकूण सेंटी टाकले असणार नेहमीचे.
*

हुंबाबा विरुद्ध (गिल्गमेश आणि एंकिडू)

ती घडी आली. दोघे हुंबाबाच्या अगदी नजीक येवोनी पोहोचले. गिल्गमेशनी कुर्‍हाडीने जवळचा भलामोठ्ठा सिडारवृक्ष एका रट्ट्यात तोडला. हुंबाबाला खिजवण्यासाठी. गांगुलाला कसं क्रीझवर आल्याआल्या बाउन्सर टाकतात. या सबप्रकरणात बर्‍याच शिव्याबिव्या असायची शक्यता आहे, जास्त अश्लील नाहीयेत, नेहमीच्याच सेमीशिव्या पण बीवेअर हं.
हुंबाबाने आवाज ऐकला आणि ओळखले की कुणीतरी झाडाला इजा केली आहे. तो प्रचंड संतापाने ओरडला -  कोण रे तो फुकणीच्चा, माझ्या झाडांच्या आसपास दंगा करतोय? मी स्वत: माझ्या हाताने लावलेली आणि लहानाची मोठे केलेली झाडे आहेत ही, कोणी भेंचोदने पाडले माझे झाड? असेल हिंमत असेल तर ये समोर, मादरचोद. त्याचा आवाज ऐकूनच गिल्गमेश गार, तोंडून एक अक्षर फुटेना, झाड तोडतानाचा सगळा आवेश क्षणभरात मावळला. आकाशातून सूर्यदेव शमाश गरजला - अजिबात घाबरू नका, मी तुमच्या सहाय्यास तत्पर आहे, हुंबाबा त्याच्या घराच्या आत जायच्या आत त्याला गाठा, त्याने आत्ता तीनच प्रभा धारण केल्या आहेत, घरात शिरून सातही धारण केल्या तर मात्र तुमची काही खैर नाही.
गिल्गमेश आणि एंकिडू लागलीच हुंबाबाचा सामना करायला त्याच्यासमोर येतात. हुंबाबाशी त्यांची नजरानजर होते, त्याचे ते रौद्ररूप पाहून त्यांची प्रमाणाबाहेर फाटते. हुंबाबा गिल्गमेशकडे अतितुच्छ कटाक्ष टाकून म्हणतो - 
तू, तू मला आव्हान द्यायला आला आहेस?  
एक लक्षात ठेव, मंदबुद्धी लोकांनी , कुठलेही काम करायच्या आधी कुणाचातरी तरी सल्ला घ्यावा. आणि तुझ्याबरोबर हा अक्करमाशा एंकिडू, ज्याच्या आईबापाचा पत्ता नाही, प्राण्यांचे स्तन चोखून दुदू पिणार्‍या आणि हरणांबरोबर गवत खाणार्‍या याला तू मित्र मानलंस?
गिल्गमेश सगळा धीर एकवटून उत्तर देतो - माझ्यावर शमाशचा वरदहस्त आहे आणि तुझा नायनाट करण्यासाठी त्यानेच मला पाठवले आहे.
हुंबाबा म्हणतो - सरळच आहे. त्या भुंडग्या शमाशच्या मदतीशिवाय तू इथपर्यंत पोचूच शकला नसतास, घाबरलौड्या. अर्रे, लहानपणी मी तुला अंगाखांद्यावर प्रेमाने खेळवलं आहे, पण आता मात्र माफी नाही, तुझ्या नरडीचा घोट घेवून, माझ्या जंगलातील गिधाड आणि डोमकावळ्यांना तुझं लुसलुशीत मांस खायला बोलावतो बघ मी आता.  
हे ऐकून गिल्गमेशचे अवसान गळते आहे हे लक्षात येताच एंकिडू म्हणतो - गिल्ग्या भावा, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देवू नकोस, तो आपल्याला बोलण्यात गुंतवून ठेवून हळूहळू आत चालला आहे, अजून प्रभा धारण करायला. आपल्या तलवारी आणि कुर्‍हाडींची ताकद माहितच आहे तुला. (इथे कुर्‍हाडदर्शन). चल जावू त्याच्या अंगावर धावून आता, होईल ते होईल. आऊट तर आऊट खेळायचं आता. 
हुंबाबा वि. गिल्गमेश, एंकिडू असे तुंबळ युद्ध सुरु होते. ऐन मोक्याच्या क्षणी शमाशदेव तेरा वेगवेगळ्या प्रकारांचे वारे सोडून हुंबाबाला जखडून ठेवतो. 
चार दिशांचे चार वारे, वादळाचा वारा, धुळीचा वारा, वावटळवारा, बर्फाचा वारा, असंच काय काय, तेरा बेरीज होईपर्यंत विशेषणे बदलायची. हुंबाबा त्या वार्‍यांच्यामुळे चांगलाच अडकला. गिल्गमेश आणि एंकिडूने आता फक्त वार करायचा अवकाश त्याचा खातमा होणारच होता.
हुंबाबाचे रुप पालटले, तो एकदम करुण दिसायला लागला व म्हणाला - अरे बेटा गिल्गू, ए छकुल्या तू लहान होतास तेव्हा मी तुला खूप खाऊ दिला आहे, खेळलो आहे, वाटल्यास तू जाऊन निन्सुनला विचार. वगैरे वगैर सेंटी मारायाला लागला.  या पॉईंटला हे स्पष्ट आहे की, हुंबाबा शमात आणि एन्लिलच्या अंतर्गत राजकारणाला बळी पडला आहे, गिल्गमेश तर शमाशचे एक प्यादं आहे. एंकिडू तर गिल्गमेशचं प्याद. प्याप्यादंच.
एंकिडू म्हणाला - अर्रे गिल्गमेश, लवकर संधी आहे तोवर मार याला, याचे रडगाणं ऐकू नकोस, एकदा का वारे संपले की हा आपल्याला सोडणार नाही.
हुंबाबा म्हणाला - का, रे, एवढा क्रूर झालास, एंकिडव्या बाळा? मी तुला बरेचदा हरणांबरोबर चरताना बघितलं होतं, मीपण तुला मारु शकलो असतो तेव्हा पण सोडून दिलं, निरागस म्हणून, त्याचे हे पांग फेडतोस?
गिल्गमेशची दयाबुद्धी जागृत होते, तो हुंबाबाला सोडून द्यायचा विचार करु लागतो, शिवाय हुंबाबाही म्हणतो - अरे, मी आयुष्यभर तुझा दास बनून राहीन, हवी तेवढी झाडं स्वत: तोडूने देईन मी तुला. फळं, फुलं, लाकूड, प्राणी, पक्षी नुसतं नाव सांग, हजर करेन.
एंकिडू प्रचंड वैतागतो, एकतर च्यायला मनाविरुद्ध आणलं त्याला एवढ्या लांब, एक रात्र झोप म्हणून नाही, पाच मिनीटं डोळा लागला की, हा सोट्या स्वप्न स्वप्न करत ओरडत उठतो. एवढं सगळं झाल्यावर आता परत हुंबाबाला सोडून द्यायचं, नंतर हुंबाबा आपल्याला मारणारच हे एंकिडूनं जाणलं.
एंकिडू गिल्गमेशला निर्वाणीचं सांगतो - अरे मार त्याला , हा नाटक करतोय लेका, आत्ता त्याला मारलं नाहीस तर नंतर माझ्या मृत्यूचं खापर तुझ्या माथी हां, आहे कबूल? शिवाय आता जर एन्लिलला याची साद ऐकू गेली तर आपलं काही खरं नाही. मग शमाशही आपल्याला वाचवू शकत नाही.
गिल्गमेश एकदाचं होयनाही करता करता, हुंबाबावर पहिला प्रहार करतो. एंकिडू पहिल्या प्रहाराचीच वाट बघत होता, महाराजांनी विशाळगडावर पोचल्यावर ज्या तत्परतेने तोफा डागायची आज्ञा दिली असेल त्याच तत्परतेने एंकिडूने लगेच सप्पासप दोनतीन वार केले. 
हुंबाबा शेवटच्या घटका मोजू लागला - त्याने आपली सगळी कर्मकहाणी गिल्गमेशला ऐकविली, मी कसा रानावनात वाढलो मग एन्लिल-निन्लिलने मला रक्षक नेमलं, तुम्ही मला उगाच मारलं वगैरे. 
एंकिडू टेन्शनमधे येतो, गिल्गमेशचे आत्तापर्यंतचे वर्तन बघता तो हुंबाबाला वाचवायचाही प्रयत्न करायला मागेपुढे बघायचा नाही असा विचार करुन तो एकच हुंबाबच्या मस्तकावर जोरदार प्रहार करतो.

आणि हुंबाबाचा खेळ खलास.

हुंबाबा मरताना भयकंर व्हॉयलंट झाला. म्हणजे हिंसकच्यापण पुढे. त्याने मुख्यत्वे एंकिडूला खूप शिव्याशाप दिले - तू गिल्गमेशला मला मारू नको म्हणून समजवायचे सोडून, मार मार म्हणून भरीस पाडलंस. अरे हुंडगीच्च्या, रानावनात वाढलेला तू असा निसर्गसंहार करायला तूच पुढे झालास? असा घनतारडा वागशील असं वाटलं नव्हतं रे एंकड्या, तू तर लय बारा बोड्याचा निघालास. कुत्र्याच्या मौतीनं नाही, कुत्रापेक्षा बेक्कार मरणार साल्या तू. माझा तळतळाट लागेल तुला.
*

परतीची तयारी.

मयतीची नव्हे, परतीची तयारी. एंकिडूने आणि गिल्गमेशने सप्पासप्प आजूबाजूचे सिडार तोडले. काय खजिनाबिजिना असलानसला तर तो ताब्यात घेतला. सर्वोच्च उंचीच्या सिडारकडे बघून एंकिडू गिल्गमेशला म्हणाला. - गिल्ग्या, या झाडाचे मी एक महाकाय दार बनविणार आहे, प्रचंड रुंद, सुंदर नक्षी, नाजूक कशिदा, झालचं तर वारली पेंटींग - वगैरे बरेच वर्णन. आणि हे झाड, टिग्रिस आणि युफ्रेटीसच्या नद्यांच्या मधोमध असलेल्या निप्पुर - म्हणजे एन्लिलच्या नगरीत त्याला अर्पण करीन. 
बहुधा हुंबाबाने मरताना दिलेल्या शिव्याशापांनी एंकिडू जरा तणावाखाली आला असावा. साहजिक आहे, त्याला वाटले असणार की, या राड्याची काही शिक्षा झाली तर ती आपल्यालाच होणार. गिल्गमेश तर बोलूनचालून दोन तृतीयांश देव. त्याच्या मका-कणीस-तुरे-भुरभुरणार्‍या एका केसालाही कोणी धक्का लावणार नाही. एन्लिल रागावू नये म्हणून एंकिडूने हे छान दार बनवायचा उपक्रम हाती घेतला असेल - रात्री एखाद्याचा ऊस जाळायचा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या दारात माफी मागायला काकवीची किटली घेवून जायचं.
असो. दोघांनी मिळून नदीतून जायला, सिडारचा एक तराफा तयार केला आणि निघाले परत - एंकिडू वल्हवत होता तर गिल्गमेश हुंबाबाचे डोके हातात घेवून उभा.

प्रचंड अशा जलप्रवाहावात मधोमध हा तराफा, आपले दोघे वीर पडद्याकडे पाठ करुन आणि समोर सूर्यदेव क्षितीजावर अस्तास जात आहे, वल्ह्याचे टोक आणि हुंबाबाचे डोके, तराफ्याबाहेर दिसत आहेत. अशा लॉगवाईड शॉटची कल्पना करा आणि फील घ्या. 

आता उभे रहा, दोन मिनीटं श्रद्धांजली हुंबाबाला. निसर्गरक्षक मेला, नागरीकरणाच्या निर्दयी दलालांनी त्याला खुलेआम, दिवसाढवळ्या कापला.
***

१. मच्छर ही परिस्थितीजन्य शब्दनिवड आहे, फक्त महाकाय पर्वत विरुद्ध गिल्गमेश हा आकारातला फरक दाखवताना जरा भारी वाटावं म्हणून. म्हणजे लिहिता लिहिता, किबोर्डमधून मच्छर शब्द निघून गेला. जाणीवपूर्वक नाही वापरला मी. मी रोजच्या जीवनात डासाला डासच म्हणतो, इतकेच काय तर अनेकदा हिंदीतही, बहुत डास थे यार उधर, असे म्हणतो. 
खरेतर एवढे स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही. पण लोकांना वाटेल हा कायमच डासाला मच्छर म्हणतो, ही शक्यताच एवढी भयावह आहे की क्षणभरासाठी मला माझ्या छातीत कळ आल्यासारखे वाटले. 
बरेचदा ऑफिसमधे आपण संडासला जातो(मी कधेकधीच - अमावस्या,पौर्णिमा जातो) तेव्हा आधी गेलेल्या मनुष्याचा राहिलेला शीचा कण असतो शीच्या भांड्यात. आपण आपल्या शीच्या आधी व नंतर प्रचंड, प्रमाणात पाणी टाकून तो कण घालवायचा प्रयत्न करतो, पण तो चिकट कण काही केल्या जात नाही. आपले काम आटपून बाहेर पडल्यावर मला कायम भिती असते, की मी बाहेर पडल्या पडल्या लगेच कुणीतरी आत जाईल. आणि त्यांना वाटेल - अरे यार, आत्ता बाहेर जो आला त्याने नीट फ्लशपण नाही केले, शी तशीच, कसला गलिच्छ आहे, शिकलेसवरलेले लोक हे असं वागतात. आपला संबंधसुद्धा नसताना आपल्यावर का आळ? तो सुद्धा असला? 
फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम असला म्हणून काय झाले? हे माझ्याबाबतीत कधी होवू नये असे मला वाटते, तसेच माझ्यावर कुणी, हा डासाला मच्छर म्हणतो असा साधा संशयही घेवू नये म्हणून हा तळटीपप्रपंच. 
धन्यवाद. 
डास म्हणतो मी.

0 comments: